Gold Medallist Neeraj Chopra: ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा जय्यत स्वागत! |Panipat| Sakal Media

2021-08-17 1,155

Gold Medallist Neeraj Chopra: ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा जय्यत स्वागत! |Panipat| Sakal Media
टोकियो ऑलिम्पिक(Tokyo Olympics) पदक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra)हा आज (ता. 17) ऑगस्टला हरियाणातील पानिपत येथील समालखा या आपल्या मुळ गावी पोहोचला. नीरजचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. नीरजची आई सरोज देवी (SarojDevi)यांनी आपल्या मुलासाठी खास चूरमा तयार केला आहे ''आम्ही त्याचे सुवर्णपदक मंदिरात ठेवणार आहोत असे त्याच्या आईने यावेळी सांगितले. मला खूर प्रेम मिळाल्याने चांगले वाटतेय. मला आशा आहे की, भालाफेक खेळाला हे सहकार्यआणि प्रेम कायम राहील; मी मेहनत करत राहील. हे पदक आणखी बऱ्याच मुलांना प्रेरणा देईल." नीरजची कामगिरी 23 वर्षामध्ये इतिहास रचणारी ठरली कारण, ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फील्डमध्ये सुवर्ण जिंकणारा तो देशातील पहिला खेळाडू ठरला. टोकियो गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळविण्यासाठी नीरजने 87.58 मीटर अंतरावर भाला फेकून विक्रमी कामगिरी केली.
#Tokyo #Olympics #GoldMedallist #NeerajChopra #Hometown #Samalkha #Panipat